
प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल ‘या’ नवरदेवासोबत अडकणार विवाहबंधनात
दै. बातमीदार । २८ ऑक्टोबर २०२२ । दिवाळी आटोपण्यात आली आहे तोच आता सर्वत्र लगीनघाई सुरु झालेली दिसून येत आहे, तर यात अभिनेतेही यंदा लग्नाचा बार उडविण्यासाठी सज्ज झाले असून नुकतीच प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल लवकरच संगीतकार मिथुनसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. पलकच्या लग्नाचे विधी 4 नोव्हेंबरपासून सुरू होतील, तर 6 नोव्हेंबर रोजी लग्नसोहळा असेल. या तीन दिवसांमध्ये हळदी, मेंदी आणि संगीत समारंभ आयोजित केले जातील. या कार्यक्रमांना मिथुन आणि पलकच्या जवळच्या मित्रांव्यतिरिक्त अनेक बी-टाउन सेलिब्रिटी उपस्थित असतील.
मिथुन आणि पलकने याआधी एकत्र काम केले असले तरी ते कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हते. हे जोडपे अरेंज्ड मॅरेज करणार आहेत. त्यांच्या दोघांच्या फॅमिली फ्रेंड्सनी हे स्थळ सुचवले आहे. खरंतर पलकच्या आई-वडिलांची तिने अरेंज मॅरेज करावे, अशी इच्छा होती. जेव्हा ते मिथुन आणि त्याच्या कुटुंबाला भेटले तेव्हा त्यांनी हे स्थळ आवडले. अशा प्रकारे दोघांचे लग्न निश्चित झाले.
कुटुंबात लग्नाची तयारी सुरू झाली
पलक आणि मिथुन दोघांचेही कुटुंब या नात्याने खूप खूश आहेत. दोघेही लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. हा लग्नसोहळा भव्य असेल, असे सांगितले जाते. म्युझिक इंडस्ट्रीसह बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पलक आणि मिथुन मुंबईत लग्न करणार आहेत. दोघांचे रिसेप्शनही मुंबईतच ठेवण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्षाच्या शेवटी हे जोडपे हनीमूनसाठी कामातून ब्रेक घेणार आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम