बोरगाव येथील शेतकरी कडुजी तागड यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या

बातमी शेअर करा...

मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील शेतकरी कडुजी दाजीबा तागड वय ५८ रा बोरगाव ता मालेगाव जि वाशिम यांनी काल दि १७ नोव्हेंबर २३ रोजी सायंकाळी ६ वा दरम्यान स्वतः च्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

मृतक शेतकरी चा मुलगा रामचंद्र कडुजी तागड यांनी पो स्टे जउळका ला फिर्याद दिली की माझे वडील काल दि १७ नोव्हेंबर २३ रोजी तुरी ला पाणी देतो असे सांगून शेतात गेले सायंकाळी शेतातून परत आले नाही त्यांचा शोध घेतला असता गव्हाळी शेतातील विहिरीत त्यांचे प्रेत तरंगताना दिसले घरात नेहमी मनत असत की या वर्षी नापिकी झाली व माझ्या अंगावर सेंट्रल बंक ,जि म सह को बँक चे कर्ज आहे ते कसे फेडू या विचारात असायचे यांनी या कर्ज बाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली आहे अशी फिर्याद दिल्यावरून पो स्टे जउलका यांनी गुन्हा दाखल केला आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम