या जिल्ह्यातील शेतकरीचे अवकाळी पावसाने केले नुकसान !
दै. बातमीदार । २२ मार्च २०२३ । राज्यात गेल्या दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस थैमान घालतोय. या पावसामुळं हजारो हेक्टर शेतीचं मोठं नुकसान झालंय. धुळे जिल्ह्यातल्या साक्रीमध्येही गारपिटीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय.
अनेक शेतकरी आपल्या शेतातल्या गारा गोळा करून बाहेर फेकताना दिसले. विदर्भात वर्ध्यातही अवकाळी पावसाचा संत्र्याच्या पिकाला फटका बसला. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावलीये. रब्बी पिकांव्यतिरिक्त संत्री, केळी, डाळिंब, द्राक्षे यांच्या लागवडीलाही फटका बसला आहे. गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. कृषी विभागातील अधिकाऱ्यानं सांगितलं की, ‘आतापर्यंत 80,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पीक नुकसानीमुळं प्रभावित झालं आहे. नुकसान तपासण्यासाठी पंचनामे प्रक्रिया अद्याप सुरू आहे.’
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम