फारुक शेख यांची महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या ऊपाध्यक्षपदी निवड

बातमी शेअर करा...

दैनिक बातमीदार | १३ नोव्हेंबर २०२२ | जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष तथा विविध क्रीडा संघटनांचे संघटक व मार्गदर्शक फारुक शेख अब्दुल्ला यांची २०२२ ते २०२५ या चार वर्षासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यांच्या या निवडीबद्दल जळगाव येथील क्रीडा, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

राज्य संघटनेवर हॅट्रिक
महाराष्ट्र राज्य संघटनेवर फारुक शेख यांची ही तिसऱ्यांदा निवड होत आहे सर्वप्रथम त्यांची सहसचिव पदी( २०१६ ते २०१९) निवड झाली होती त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये खजिनदार पदी (२०१९ ते २०२२) निवड झाली व आता २०२२ ते २५ या कालावधीसाठी उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे.
यापूर्वी सेंट्रल महाराष्ट्र चेस असोसिएशन च्या सचिव पदाची सुद्धा भूमिका फारुक शेख यांनी उत्कृष्टपणे पार पडलेली आहे.

बुद्धिबळ खेळाचे खेळाडू नसले तरी त्यांच्यात असलेले संघटन कौशल्य व संघटनेला पुढे घेऊन जाण्यासाठी असलेली सचोटी पाहून त्यांची ही बिनविरोध निवड झाली असल्याचे महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष अशोक जैन व वरिष्ठ उपाध्यक्ष तथा ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांनी आपले मत व्यक्त केले.

जळगाव जिल्हा बुद्धिबळ व विविध तर्फे संघटने तर्फे अभिनंदन
जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, खजिनदार अरविंद देशपांडे, सहसचिव शकील देशपांडे व संजय पाटील, संचालक एडवोकेट अंजली कुलकर्णी, रवींद्र धर्माधिकारी, आर के पाटील, प्रवीण ठाकरे तसेच हॉकी, फुटबॉल,क्रिकेट,टेबल टेनिस, व्हलीबॉल, जलतरण व टेबल टेनिस क्रीडा संघटना तर्फे सुद्धा त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम