गुजरातमध्ये भीषण अपघात ; ९ ठार तर ३० जखमी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ डिसेंबर २०२२ । गुजरातमध्ये मोठा अपघाताची बातमी समोर आली आहे. नवसारी जिल्ह्यात वर्ष अखेरीस शेवटच्या दिवशी शनिवारी सकाळी फॉर्च्युनर कार आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्झरी बस अहमदाबादहून वलसाडला जात होती. त्यावेळी नवसारी जिल्ह्यातील वेसवण गावात ही दुर्घटना घडली.

गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. अमित शाह म्हणाले, गुजरातच्या नवसारीतील रस्त्यावरील अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या घटनेत ज्यांनी आपले कुटुंब गमावले आहे. त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहे, स्थानिक प्रशासन जखमींना तत्काळ उपचार देत आहे, जखमी त्वरीत बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करतो.नवसारीचे पोलिस अधीक्षक (एसपी) हृषिकेश उपाध्याय यांनी सांगितले की, बस वलसाडच्या दिशेने जात असताना वेसवण गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. तर एसयूव्ही विरुद्ध दिशेने येत होती. गुजरातचे नवसारी डीएसपी व्हीएन पटेल म्हणाले की, नवसारीतील अहमदाबाद-मुंबई महामार्गावर बस-कारच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहेत. एक गंभीर जखमीला सुरत येथे रेफर करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम