नाशिक-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात ; ५ लाखांची मदत जाहीर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ जानेवारी २०२३ । आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नाशिक-शिर्डी महामार्गावर वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलंय. या अपघात इतका भीषण होता कि अपघातात १० जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.या अपघाताचं वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त, तसंच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीनं शिर्डी-नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत, तसंच हा अपघात नेमका कशामुळं झाला त्याची चौकशी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम