पेट्रोल भरायचे ? जाणून घ्या किती आहे दर !
दै. बातमीदार । १७ जानेवारी २०२३ । जगातल्या बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये थोडीशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या कच्चं तेल प्रति बॅरल 84 डॉलरच्या वर पोहोचलं आहे. अशातच भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आज मंगळवारी देशातील महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
कच्च्या तेलाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या 24 तासांत त्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत आज जवळपास एका डॉलरनं घसरून प्रति बॅरल 84.11 डॉलरवर पोहोचली आहे. WTIची किंमत देखील सुमारे 0.80 डॉलरनं घसरून 78.77 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे.
देशातील महानगरांत आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, काही शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांत किरकोळ बदल झाला आहे. महाराष्ट्रात जुलै महिन्यापासून इंधन दर स्थिर आहेत. जुलै महिन्यात राज्य सरकारने पेट्रोलचे दर प्रति लिटर 5 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील इंधन दर स्थिर आहेत.
देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेलचे दर काय?
शहरं पेट्रोलचे दर (प्रति लिटर) डिझेलचे दर (प्रति लिटर)
मुंबई 96.72 रुपये 89.62 रुपये
दिल्ली 106.31 रुपये 94.27 रुपये
कोलकाता 106.03 रुपये 92.76 रुपये
चेन्नई 102.63 रुपये 94.24 रुपये
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम