दै. बातमीदार । ८ फेब्रुवारी २०२३ । केरळच्या ट्रान्सजेंडर जोडप्याला नुकतीच गर्भधारणेची घोषणा केली होती. आज बुधवारी कोझिकोड येथील सरकारी रुग्णालयात बाळ झाले आहे. ही देशातील अशी पहिलीच घटना आहे. “सकाळी 9.30 च्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सिझेरियनद्वारे बाळाचा जन्म झाला,” असे ट्रान्स जोडप्यापैकी एक झिया पावल यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. बाळ आणि बाळाला जन्म देणारा तिचा जोडीदार जहाद दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे झियाने पुढे सांगितले.
तथापि, ट्रान्स व्यक्तीने नवजात मुलाची लिंग ओळख उघड करण्यास नकार दिला आणि सांगितले की, ते आत्ताच सार्वजनिक करू इच्छित नाहीत. झिया पावलने अलीकडेच इंस्टाग्रामवर जहाद आठ महिन्यांची गरोदर असल्याचे जाहीर केले होते. पोस्टमध्ये म्हटले होते की, “आम्ही माझे आई होण्याचे आणि त्याचे वडील बनण्याचे स्वप्न साकार करणार आहोत. आठ महिन्यांचा गर्भ आता (जहादच्या) पोटात आहे.. आम्हाला जे कळले त्यावरून भारतातील ट्रान्स मॅनची ही पहिलीच गर्भधारणा आहे…”
झिया पावल आणि जहाद हे जोडपे गेल्या तीन वर्षांपासून एकत्र आहेत. शेअर केल्यापासून, जिया आणि जहादच्या इंस्टाग्राम पोस्टला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. इंटरनेट युझर्सनी या जोडप्याचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. युझर्सनी हार्ट इमोजींनी कॉमेंट सेक्शनही भरून काढले आहे.
झिया पावल या प्रोफेशनल डान्सरने 4 फेब्रुवारीला इंस्टाग्रामवर घोषणा केली होती की, तिचा पार्टनर जहादच्या पोटात आठ महिन्यांचे बाळ वाढत आहे. पावल यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले की, माझे आई आणि तिचे वडील बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. जहादच्या पोटात आठ महिन्यांचा गर्भ आहे… भारतात ट्रान्सजेंडर व्यक्तीची गर्भधारणेची ही पहिलीच घटना आहे. वास्तविक, हे जोडपे गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत होते आणि त्यांचे लिंग बदलण्यासाठी हार्मोन थेरपी घेत होते. जहाद पुरुष बनणार असला तरी मूल होण्याच्या इच्छेने त्याने ही प्रक्रिया थांबवली. प्रसारमाध्यमांना संबोधित करताना पावलने म्हटले की, ट्रान्सजेंडर समुदाय समाजात सतत भीतीच्या सावटाखाली जगतो. समाज काय विचार करेल याची आम्हा सर्वांनाच चिंता होती. अनेक ट्रान्सजेंडर लोक आहेत ज्यांना पालक व्हायचे आहे. अनेक ट्रान्सजेंडर लोक आहेत ज्यांची गर्भधारणा शक्य आहे, परंतु ते पुढे येत नाहीत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम