द्रुतगती मार्गावर धावत्या स्लीपर बसला आग !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ९ नोव्हेबर २०२३

देशभरातील अनेक महामार्गावार अपघाताची घटना घडत असतांना दि.८ बुधवार रोजी रात्री गुरुग्राममध्ये धावत्या स्लीपर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या अपघातात १४ जण भाजले गेले आहेत. हि घटना दिल्ली-गुरुग्राम द्रुतगती मार्गावरील झारसा उड्डाणपुलाजवळ घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. 5 जखमींना मेदांता हॉस्पिटलमध्ये, तर 7 जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आग कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

गुरुग्रामचे पोलिस आयुक्त विकास कुमार अरोरा यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे 35-40 लोक प्रवास करत होते जे उत्तर प्रदेशचे रहिवासी होते आणि दिवाळीनिमित्त आपल्या घरी जात होते. या लोकांनी लहान गॅस सिलिंडरही सोबत ठेवले होते. आयुक्त अरोरा पुढे म्हणाले की, या छोट्या सिलिंडरमुळे आग लागली असावी, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, फॉरेन्सिक टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. घटनेनंतर बसचालक पळून गेला असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम