दै. बातमीदार । २ एप्रिल २०२४ । चोपडा शहरातील प्रेमसंबंधातून घडलेल्या दुहेरी खून खटल्यातील पाच जणांना न्यायालयाने दोषी ठरवित त्यांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा न्या. पी.आर चौधरी यांच्या न्यायालयाने ठोठावली आहे. तर दोन आरोपींना पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मदत केल्याप्रकरणी ५ वर्ष शिक्षा एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
अमळनेर येथे शालेय विद्यार्थ्यांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू
मयत वर्षा समाधान कोळी व राकेश संजय राजपूत यांच्यात प्रेमप्रकरण सुरू होते. तरुणीने तरुणासोबतचे प्रेमसंबंध तोडावे म्हणून त्यांच्या कुटुंबात वाद सुरु होते. दि. १२ ऑगस्ट रोजी वर्षा व राकेश यास बोलतांना पाहिल्यावर याचा राग येऊन राकेशच्या बहिणीला पकडल्याने त्यांची विचारपुस केली असता, त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या बहिणीला व तिचा प्रियकर राकेश राजपूत याला मोटारसायकलवर बसवून त्यांना चोपड्याजवळील नाल्याजवळ जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, राकेश याने मारेकऱ्यांच्या तावडीतून सुटका करुन घेत पळून जात असतांना तुषार याने गावठी कट्ठयातून गोळीबार केल्यानंतर ही गोळी राकेशच्या डोक्यात लागून त्याचा मृत्यू झाला. यावेळी त्याची प्रेयसी वर्षा ही प्रतिकार करीत असताना गळा आवळून खून केला होता.
खासदार उन्मेष पाटील करणार शिवसेनेत प्रवेश? वाचा सविस्तर
या प्रकरणी चोपडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर अमळनेरच्या सत्र न्यायालयात हा खटला चालला. यात २१ साक्षीदारांची तपासणी घेण्यात आली. यानंतर न्यायाधिशांनी सोमवारी आनंदा आत्माराम कोळी ( वय ५६); रवींद्र आनंदा कोळी ( वय २०); तुषार आनंदा कोळी ( वय २३); भरत संजय रायसिंग ( वय २२) आणि शांताराम उर्फ बंटी अभिमन कोळी ( वय १९) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पैरवी अधिकारी सफौ उदयसिंह साळुंखे, हिरालाल पाटील, नितीन कापडणे, विशाल तायडे यांनी सहकार्य केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम