ख्रिसमसचा आनंदात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ? जाणून घ्या आजचे दर
दै. बातमीदार । २५ डिसेंबर २०२२ । जगभरात ख्रिसमसचा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. तर महागाईच्या गर्तेत सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविली जात असल्याचे दिसून आले आहे. आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत सतत घसरण होत असताना भारतीय तेल कंपन्यांनी नेहमीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले असले तरी, आज सलग 213वा दिवस असून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नरमल्यानंतर पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. सध्या WTI क्रूड प्रति बॅरल 80 डॉलर आणि ब्रेंट क्रूड 85 डॉलर प्रति बॅरल जवळ पोहोचलं आहे. जुलै 2008 नंतर यावर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहोचल्या. तेव्हापासून, 46 टक्क्यांच्या घसरणीसह, ते प्रति बॅरल 76 डॉलरच्या जवळ व्यापार करत आहे. ही या वर्षातील सर्वात कमी पातळी आहे. कच्च्या तेलाचा लिटर आणि रुपयांच्या संदर्भात अंदाज लावला तर 9 महिन्यांत किंमत 33 रुपयांहून अधिककमी झाल्या पाहिजेत. यानंतरही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत घट झालेली नाही.
नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम