पुण्यात पंतप्रधान मोदींच्या विरोधात लागले फ्लेक्स !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३१ जुलै २०२३ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच पुणे दौरा निश्चित झाला असून ते उद्या १ ऑगस्ट रोजी पुण्यात येत असून या दौर्‍याला पुणे शहर युवक काँग्रेसकडून विरोध दर्शविण्यात येत असून त्यांच्याकडून ‘गो बॅक मिस्टर क्राईम मिनिस्टर’ अशा आशयाचे फ्लेक्स शहरातील अनेक भागांत लागले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने १० जुलै रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि विश्‍वस्त डॉ. रोहित टिळक यांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आलेल्या पुरस्काराच्या कमिटीमध्ये रोहित टिळक होते आणि ते काँग्रेस पक्षाचे पदाधिकारीदेखील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार दिला जाऊ नये अशी मागणी शहरातील काँग्रेस पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रोहित टिळक यांच्याकडे केली होती. तर या पुरस्काराबाबत हायकमांडकडे तक्रार करीत नाराजीदेखील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती.

या सर्व घडामोडीनंतर उद्या १ ऑगस्ट रोजी होणार्‍या पुरस्कार सोहोळ्याला विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह अनेक संघटना एकत्रित आल्या आहेत. उद्या ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाण्याच्या मार्गावर मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले जाणार आहे. पण त्यापूर्वीच शहर काँग्रेसकडून ‘गो बॅक मिस्टर क्राईम मिनिस्टर’ अशा आशयाचे फ्लेक्स शहरातील अनेक भागांत लागले आहे. या फ्लेक्सची राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम