मुंबई विमानतळावरुन २५० विमानांचं उड्डाण रद्द !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २४ सप्टेंबर २०२३ | मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या ठिकाणाहून एकाच दिवशी एक-दोन नव्हे तर तब्बल २५० विमानांचं उड्डाण रद्द होणार आहे. काही विमानांच्या वेळा बदलण्यात येणार आहेत. येत्या १७ ऑक्टोबर रोजी धावपट्टी बंद असणार आहेत.

मुंबईमधलं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अत्यंत व्यग्र असलेलं विमानतळ आहे. लाखो प्रवाशांना या विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय प्रवास करावा लागतो. त्यामुळे ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहेत. डागडुजीच्या कामासाठी येत्या १७ ऑक्टोबर रोजी मुंबई विमानतळावरील धावपट्टी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल २५० विमान उड्डाणं रद्द किंवा त्यांच्या वेळांमध्ये बदल होऊ शकतो. त्याबद्दलची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. विमानांचं लँडिंग आणि टेकऑफ सुरळीत व्हावं, यासाठी पावसाळ्याच्या अगोदर आणि पावसाळ्यानंतर धावपट्ट्यांची डागडुजी केली जाते. पावसाळ्यापूर्वी हे काम करण्यात आलेले होते. आता पावसाळ्यानंतर डागडुजीचे काम होणार आहे. विमानतळाचे संचलन करणाऱ्या ‘मिआन’ कंपनीने यासंदर्भात माहिती दिली आहे.

दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत डागडुजीच्या कामामुळे धावपट्टी बंद ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी १८ ऑक्टोबर २०२२ रोजी डागडुजी करण्यात आलेली होती. त्यानंतर यंदा पावसाळ्यापूर्वी हे काम उरकण्यात आले. आता पावसाळा संपल्यानंतर पुढच्या महिन्यात डागडुजी होईल.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम