दै. बातमीदार । १७ डिसेंबर २०२२ । देशात गेल्या काही दिवसापासून कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर इंधन दरवाढीमुळे सामान्यांचे बजेट आणखी बिघडण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या दरात होत असलेल्या घसरणीचा फायदा अजूनही ग्राहकांना मिळाला नाही. दिल्लीत सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे इंधन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात बदल केला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचा दर 79.04 डॉलर प्रति बॅरल इतका आहे. तर, WTI क्रूड ऑइलचा दर 74.29 डॉलर प्रति बॅरल इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत आहे.
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम