कायद्याची शिस्त पाळा, कारवाई टाळा : पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

     जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री एम राजकुमार यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या गेल्या त्यामध्ये भडगाव चे पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांची जळगाव सायबर विभागात बदली झाल्याने त्यांच्या जागी भडगाव तालुका पोलीस स्टेशन येथे बुलडाणा येथून आलेले पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांची बदली करण्यात आली आहे. त्याचे मुळ गाव भडगाव तालुक्याशेजारील एरंडोल तालुक्यातील भातखेडा आहे.
     पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील कर्तव्यदक्ष व कठोर निर्णय घेणारे अधिकारी असल्याचे त्यांच्या प्रभार घेण्याअगोदर चर्चिले जात होते. त्याच्याच प्रत्येय भडगावकराना येत असून त्यांनी पोलीस स्टेशन चा चार्ज घेत नागरिकांना कायद्याच्या शिस्तीत राहन्याचे आवाहन केले तसेच भडगाव शहरात पेट्रोलिंग करत रोडवर असणाऱ्या बेशिस्त पार्किंग वाहन धारकांना वाहन पार्किंग चे धडे देत थेट कार्यवाही चा ही इशारा त्यांच्या कळून देण्यात आला यावेळी त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून काही वाहन धारकांनवर कार्यवाई करीत वाहने थेट पोलीस ठाण्यात जमा केली त्यांच्या या दबंग कार्यवाई ची लोकांनमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.

    भडगाव तालुक्यातील विविध संघटना, सामाजीक संस्था, राजकीय बिगर राजकीय, सामान्य भडगावकराच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात येत असून यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील त्यांच्या वतीने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य असावे असे आवाहन करण्यात येत आहे तसेच कायद्याची शिस्त पाळत गेली नाही तर कार्यवाई ही अटळ असेल असे स्पष्टपणे आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम