स्मार्टफोन ठेवा सुरक्षित या टिप्स करा फोलो !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ जानेवारी २०२३ । सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीजवळ आपल्या स्मार्टफोन २४ तास असतो. कुणीही स्मार्टफोन सोडून वावरूच शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे साहजिकच तुमच्या स्मार्टफोन काही अडचणी येत असतीलच. स्मार्टफोनची सुरक्षा हे सायबर गुन्हे घडण्यामागे एक प्रमुख कारण आहे.आज तुम्हाला अशा काही टिप्स वाचायला मिळणार आहेत, ज्यामुळे तुम्ही स्वतःला ऑनलाइन फ्रॉडपासून सुरक्षित राहाल.

आजकाल स्पॅमर स्पॅम लिंक, व्हायरस किंवा फोन हॅकिंगच्या मदतीने बँक अकाऊंट किंवा नेट बँकिंग खात्याशी संबंधित माहिती मिळवून तुमच्या बँकेतून सर्व पैसे लंपास करतात. आता स्मार्टफोन कंपन्या ग्राहकांच्या सोयीसाठी फोनमध्ये चांगली सुरक्षा व्यवस्था देत असल्या तरीही फोनला स्पॅमर्सपासून सुरक्षित ठेवणं एक आव्हान बनलय. पण या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन सुरक्षित ठेवू शकता.

तसं बघायला गेलं तर आजकाल जवळपास सर्वच स्मार्टफोनमध्ये फोन लॉक करण्याची सोय असते. जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये महत्त्वाची कागदपत्रे, बँक खात्याशी संबंधित काही डॉक्युमेंट आणि स्वतःचे पर्सनल फोटो ठेवत असाल तर फोन लॉक ठेवा. तुमच्या स्मार्टफोनमध्ये फोन लॉक करण्यासाठी बरेच इनबिल्ट फीचर्स असतील. जसं की पिन, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंट. अशा परिस्थितीत फोन हरवला तरी तुमच्या फोनचा डेटा सुरक्षित राहील.

बऱ्याचदा घडतं असं की लोक खूप दिवसांपर्यंत एकच पासवर्ड वापरत राहतात. असा पासवर्ड फोनमध्ये जास्त वेळ ठेवू नये. फोनचा पासवर्ड वेळोवेळी बदलत राहा. पासवर्ड बदलल्याने स्मार्टफोन हॅक होण्याचा धोका कमी होतो, याशिवाय कोणत्याही अॅपवर तुमचं युजरनेम आणि पासवर्ड सेव्ह करण्यापूर्वी त्यांच्या टर्म्स अँड कंडीशन काळजीपूर्वक वाचा. कधीकधी ही माहिती थर्ड पार्टी ॲपला उपलब्ध करून दिली जाते.
ऑनलाइन फसवणुकीच्या बहुतांश घटनांमध्ये असं दिसून आलंय की हॅकर्स किंवा स्पॅमर फोनवर स्पॅम लिंक पाठवतात. यात वाय-फायचा वापर हे सर्वात मोठं कारण आहे. स्मार्टफोनसाठी अनेक अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून व्हायरस आणि मालवेअर काढून टाकू शकता, ज्यामुळे तुमचे वैयक्तिक तपशील सुरक्षित राहतील.

स्मार्टफोन कंपन्या ग्राहकांना फोनच्या ऑपरेटिंग सिस्टीमचे अधूनमधून अपडेट देत असतात. तुम्ही तुमचा स्मार्टफोन अपडेट ठेवल्यास, डिव्हाइसच्या जुन्या OS सिस्टीम मध्ये असलेले अनेक प्रकारचे व्हायरस आणि बग काढून टाकले जातात, ज्यामुळे डिव्हाइसवरील मालवेअर आणि व्हायरसचा धोका कमी होतो.

बऱ्याचदा आपण अनसेफ लिंक आणि अनसर्टिफाइड प्लॅटफॉर्मवरून गेमिंग अॅप किंवा इतर अॅप डाउनलोड करतो. अशा परिस्थितीत, डिव्हाइसशी संबंधित बहुतेक माहिती स्पॅमर्स किंवा थर्ड पार्टी अॅप्सच्या युजरपर्यंत पोहोचते, ज्यामुळे ऑनलाइन फसवणूक होण्याचा धोका वाढतो. म्हणून अँड्रॉइड स्मार्टफोन युजरने केवळ Google Play Store वरून अॅप डाउनलोड करावं आणि iPhone युजर Apple Store वरून अॅप डाउनलोड करायला हवं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम