मोबाईलला Ringtone बनवायची या टिप्स करा फोलो !
दै. बातमीदार । १७ फेब्रुवारी २०२३ । देशात जसा मोबाईलचा शोध लागला त्यावेळेस मोबाईलला असणारी रिंगटोन तुम्हाला नक्की आठवत असेल ती रिंगटोन व आजच्या युगातील रिगटोन नक्की फरक पडलेला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी लोकांमध्ये आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या Ringtone ठेवण्याची क्रेझ होती. मात्र, अजूनही बहुतेक लोकं काही दिवसांच्या अंतराने आपली रिंगटोन बदलत असल्याचे पहायला मिळते. अनेकदा प्रवास करताना आपल्याला अशा काही रिंगटोन ऐकायला मिळतात, जे ऐकून त्या आपल्यालाही ठेवाव्याशा वाटतात.
काही रिंगटोनमध्ये तर एखाद्याचे नावही ऐकायला मिळते. मात्र अशी नावाची रिंगटोन ऐकल्यावर ती कुठे मिळेल हे समजतच नाही. हे जाणून घ्या कि, Ringtone बनवण्यासाठी Online Website, Offline Text to speech Software, Application यासारखे अनेक मार्ग आहेत. चला तर मग आज आपण त्याविषयीची माहिती जाणून घेउयात.
वेबसाइट द्वारे अशा प्रकारे तयार करा आपल्या नावाची रिंगटोन सर्वात आधी F.D.M.R (Free Download Mobile Ringtone) freedownloadmobileringtones च्या वेबसाइटवर जा. यावर ‘सर्च रिंगटोन्स’ हा पर्याय दिसेल, जिथे आपले नाव टाकून सर्च करा. यानंतर आपल्या नावाचे अनेक रिंगटोन दिसतील. या लिस्टमधून आपल्या आवडीच्या रिंगटोनवर क्लिक करून ती डाउनलोड करा.
Application द्वारे अशा प्रकारे तयार करा रिंगटोन यासाठी सर्वात आधी प्ले स्टोअरवर जा आणि FDMR – नेम रिंगटोन्स मेकर App सर्च करा. या App च्या मदतीने कोणत्याही गाणाच्या Music द्वारे आपल्या नावाची MP3 रिंगटोन ऑफलाइन बनवता येईल. App इन्स्टॉल करा आणि उघडा. यामध्ये ऑडिओ कन्व्हर्टर देखील मिळेल. हे App MP3, M4A, WAV, WMA, AAC इत्यादी सर्व फॉरमॅटला सपोर्ट करते. त्यामध्ये आपल्या नावाचा ऑडिओ रेकॉर्ड करा. आपल्याला हवी असेल तर गाण्यांची फाईल देखील जोडू शकाल. यानंतर आपल्या नावाची रिंगटोन ‘Save’ करा. अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://freedownloadmobileringtones.com/tag/fdmr-my-name-ringtone
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम