या कारणाने तरुणाने दिली पवारांना धमकी !
दै. बातमीदार । १३ जून २०२३ । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर केवळ लग्न जमत नसल्यामुळे एका तरुणाने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ‘तुमचा दाभोलकर करू’ अशी धमकी पवारांना देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सागर बर्वे या तरुणाला बेड्या ठोकल्यात. पवारांना धमकी दिल्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या होत्यात. धमकी देणारा तरुण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोपही झाला होता. मात्र,
काय आहे प्रकरण ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरून ‘तुमचा देखील दाभोलकर करू’ अशी धमकी मिळाली होती. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेत तक्रार दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास करून कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या. तर ‘मी धमकीची मी चिंता करीत नाही. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी सरकारची आहे. ज्यांच्या हातात सूत्र त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही. त्यांनी यासंबंधी जबाबदारी घ्यावी,’ असे म्हणत सुरक्षेचा चेंडू शरद पवारांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टाकला होता.
शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी सागर बर्वे या तरुणाला पुण्यात बेड्या ठोकल्यात. ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या फेसबुक पेजवरून आणि नर्मदाबाई पटवर्धन या नावाच्या फेक अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली होती. विशेष म्हणजे सागर बर्वे हा कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नसल्याचे समजते. सागर बर्वे हा तरुण अविवाहित असल्याचे समजते. काही केल्या त्याचे लग्न जमत नव्हते. त्यात महाराष्ट्रात अचानक औरंगजेबाच्या फोटोवरून वाद निर्माण झाला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगत गेल्या. या साऱ्याचा राग येऊन त्याने ही धमकीची पोस्ट लिहिली. याशिवाय यामागे आपला कोणताही हेतू नसल्याची माहिती सागरने पोलिसांना दिल्याचे समजते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम