चोपडा तालुक्यात ३ लाखांची जबरी चोरी; गुन्हा दाखल 

सोन्याच्या दागिन्यासह घरातील भांडे लांबविले 

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ ऑक्टोबर २०२२ । तालुक्यातील चुंचाळे येथील स्ट्रीम बिल्डींगमधील २०१ रूममधील घरात प्रवेश करीत सुमारे ३ लाख रुपयांचे सोन्याच्या दागिन्यासह घरातील भांडे चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील चुंचाळे येथील स्ट्रीम बिल्डींगमधील २०१ रूममधील घराचे कुलूप तोडून संशयित तिघांनी प्रवेश करीत घरातील सोन्याचे दागिने व गृहउपयोगातील लहान मोठे स्टील व पितळी भांडे असा एकूण ३ लाख रुपयाचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार संदीप छगन पटेल रा.चुंचाळे यांनी चोपडा शहर पोलिसात दिली आहे. याप्रकरणी  संशयित आरोपी सुभाष रमेश चौधरी, दीपक शांताराम पाटील व कल्पेश मधुकर चौधरी सर्व रा. चुंचाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अजित सावळे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम