माजी मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ जुलै २०२३ । राज्याच्या राजकारणात मोठी धुमाकूळ सुरु आहे तर दुसरीकडे पावसाळी अधिवेशन सुरू असून आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानभवनात आले होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची भेट झाली. या भेटीवेळी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवनातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात जाऊन उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट होती. अजित पवार यांची भेट घेऊन चांगलं कामं करावं असं उद्धव ठाकरे यांनी या भेटीवेळी म्हटलं. राज्यात पाऊस पडत आहे, शेतकऱ्याला मदत करायला हवी. डोळे बंद ठेवून बसणारा धृतराष्ट्र नाही तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम