
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल !
दै. बातमीदार । ४ जानेवारी २०२३ काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना बुधवारी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी सोनिया यांच्यासोबत मुलगी प्रियांका गांधी वढ्रादेखील उपस्थित असून, सोनिया गांधींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे प्रियांका यांनी म्हटले आहे.
पीटीआयच्या सूत्रांनी सोनिया गांधींना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशातील बागपत येथील मावी कलान येथून सकाळी सहा वाजता सुरू झाली. मात्र, यात प्रियांका गांधी यात सहभागी झाल्या नाहीत. दुपारनंतर त्या भारत जोडोत सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.
Former Congress president Sonia Gandhi admitted to Ganga Ram Hospital in Delhi for routine check-up: Sources
— Press Trust of India (@PTI_News) January 4, 2023
24 डिसेंबर रोजी सोनिया गांधी दिल्लीतील भारत जोडो यात्रेत सहभागी होत राहुल गांधींसोबत थोडे अंतर पायी चालत गेल्या होत्या. याआधी सोनिया गांधी ऑक्टोबरमध्ये कर्नाटकात भारत जोडोत सहभागी झाल्या होत्या. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोविडची लागण झाल्यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यात दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम