दै. बातमीदार । १७ फेब्रुवारी २०२३ । रोटरी क्लब जळगावतर्फे रविवार, दि. १९ जानेवारी २०२३ रोजी धानोरा येथे विनामूल्य वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. झि. तो. महाजन माध्यमिक व ना. भा. पाटील ज्युनिअर कॉलेज येथे सकाळी ९ ते १ वेळात हे शिबीर होणार आहे. या शिबिरात पुरुष, महिला व बालकांची तपासणी होणार असून धानोऱ्यासह देवगाव, पारगाव, मितावली, मोहरद, बिडगाव व चिंचोली गावातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष राजेश वेद व मानद सचिव गिरीश कुळकर्णी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
पुरुष व महिलांसाठी जनरल तपासणी यात बीपी, शुगर, हृदय व थंडीताप तसेच डोळे, दात व हाडांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच बालकांची सर्वप्रकारची व स्त्रीरोगांची तपासणी करण्यात येणार आहे. डोळ्यांचे ऑपरेशन करण्याची आवश्यकता असेल त्यांची विनामूल्य शस्त्रक्रिया जळगाव येथे करण्यात येणार आहे. सर्वांसाठी आवश्यक असणारी औषधेही विनामूल्य देण्यात येणार आहे. लहान मुलांचे फाटलेले ओठ, टाळू तसेच हृदयाला छिद्र यासारख्या कोणत्याही शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यासाठी आयोजक विशेष प्रयत्न करणार आहेत. जळगावातील सुमारे १५ अनुभवी डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार असून त्यांना रोटरी सदस्यांसह स्थानिक नागरिकांचे यासाठी सहकार्य लाभणार आहे. शिबिराचा लाभ घेण्यासाठी गिरीश कुळकर्णी, संदीप गुजर, वासुदेव महाजन व देविदास महाजन यापैकी एका जणांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
आदिवासी पाड्यांवर करणार कपडे वाटप
रोटरी क्लब जळगावतर्फे चिंचपाडा धरणाजवळील बडवानी पाड्यांवरील आदिवासी बांधवांना सकाळी ८ वाजता नवीन व जुने कपड्यांचे तसेच सोलापुरी चांदरींचे वाटप करण्यात येणार आहे. रोटरीचे माजी अध्यक्ष कॅप्टन मोहन कुळकर्णी व त्यांचे सहकारी यासाठी कार्यरत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम