श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त नागरिकांना मोफत साखर व डाळ वाटप

बातमी शेअर करा...

अंबरनाथ | 30 जानेवारी 2024 | अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघात नागरिकांना विविध ठिकाणी मोफत साखर आणि डाळ वाटप करण्यात येत आहे. सोमवारी अंबरनाथचे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या पुढाकाराने खुंटवली परिसरातील नागरिकांना साखर आणि डाळ वाटप करण्यात आले. तसेच उल्हासनगर उपजिल्हा प्रमुख अरुण आशान यांच्या पुढाकाराने उल्हासनगर कॅम्प नंबर ४ परिसरातील नागरिकांना साखर आणि डाळ वाटप करत या आनंदोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.

या प्रसंगी शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, निखिल चौधरी यांच्यासह विविध स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम