एसटीतून ‘या’ व्यक्तीचा मोफत प्रवास बंद !
दै. बातमीदार । १५ जुलै २०२३ । राज्यातील शिंदे सरकारने अनेकांना एसटीच्या गाड्यांमधून वेगवेगळ्या योजनेतून प्रवास कमी खर्चात व काहींचा फुकट प्रवास केल्याने सरकारचे अभिनंदन होत असतांना सरकारने मात्र काही घटकाला एसटीतील प्रवास करण्याची परवानगी नाकारली आहे.
एसटी महामंडळाने गेल्यावर्षीपासून अमृत योजनेद्वारे 75 वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची मूभा दिली आहे. त्यानंतर एसटीने अलिकडेच महिलांना एसटीच्या सर्व श्रेणीच्या बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवासाची सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे महिलांना प्रचंड फायदा झाला आहे. तसेच महामंडळाचे प्रवाशांमध्येही वाढ झाली आहे. एसटी महामंडळ विविध 29 समाजघटकांना प्रवासात सवलत देत असते. याची भरपाई राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन करीत असते. आता मात्र नवे परिपत्रक काढण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसवाहतूक विभागाच्या 2018 सालच्या परिपत्रक अनूसार एसटीतून सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्ण आदींना विनामुल्य प्रवास सवलत देण्यात आली होती. आता या घटकांना निमआराम किंवा आराम या बस सेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही. सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना एसटीच्या केवळ साध्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या दुर्धर आजारी व्यक्तींना एसटीच्या निमआराम हिरकणी, वातानुकूलित अश्वमेध, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बसमधून सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाचे महाव्यवस्थापक ( वाहतूक ) शि.मं.जगताप यांनी दिले आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम