बातमीदार | १६ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही महिन्यापासून ‘गदर-२’ चित्रपटाचे गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर या महिन्यात १५ ऑगस्टपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हिंदुस्तान जिंदाबाद है.. जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा.. या डायलॉगने पुन्हा एकदा संपूर्ण भारतीय नागरिकांना अक्षरश: वेड लावलं आहे. तारा सिंग आणि सकिनाच्या अनोख्या लव्हस्टोरीचा एक नवीन टप्पा ‘गदर 2’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गदर 2’ या चित्रपटाने स्वातंत्र्यदिनी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी सर्वांत जास्त कमाई करणारा आणि सर्वांत जास्त पाहिला गेलेला भारतीय चित्रपट ठरला आहे. पाचव्या दिवशी या चित्रपटाचे शोज हाऊसफुल होते.
‘गदर 2’ने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी आतापर्यंत सर्वाधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने 55.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात तब्बल 230 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये पाचव्या दिवसाची कमाई सर्वांत जास्त आहे. कमाईच्या या दमदार आकड्यांसह सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या ‘गदर 2’ने प्रभासच्या बाहुबली 2, सलमान खानच्या सुलतान आणि हृतिक रोशनच्या वॉर या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. पाचव्या दिवशी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘गदर 2’ हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी शाहरुख खानच्या ‘पठाण’ने 58.5 कोटी रुपयांची कमाई केली होती.
‘गदर 2’ची कमाई ज्या गतीने होत आहे, ते पाहून हा चित्रपट लवकरच ब्लॉकबस्टर ठरू शकतो, अशी शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवली आहे. या चित्रपटाच्या कमाईचे आकडे आता फक्त शाहरुखच्या ‘पठाण’पासून काही अंकांनी दूर आहेत. या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘गदर 2’ दुसऱ्या क्रमांकावर आहे. शुक्रवार- 40.10 कोटी रुपये शनिवार- 43.08 कोटी रुपये रविवार- 51.70 कोटी रुपये एकूण- 173.58 कोटी रुपये
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम