
‘गदर 2’ टीझरने प्रेक्षकांची वाढवली उत्सुकता !
दै. बातमीदार । १२ जून २०२३ । बॉलीवूड क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून अभिनेता सनी देओल याच्या ‘गदर 2’ ची मोठी चर्चा सुरु होती. त्यानंतर याचा टीझर सुद्धा आता आऊट झाला आहे. या धमाकेदार टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. तारा सिंह आणि सकीनाची जोडी 21 वर्षांनंतर आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ‘गदर 2’ या सिनेमात सनी देओल आणि अमीषा पटेल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘गदर 2’च्या टीझरच्या सुरुवातीला एका महिलेचा आवाज ऐकू येत आहे. ती म्हणत आहे,”दामाद है ये पाकिस्तान का, उसे नारियल दो, टीका लगाओ वरना इस बार वो दहेज में पूरा लाहौर जाएगा”. ‘गदर 2’चा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला असून प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. ‘गदर 2’चा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘गदर 2’चं शूटिंग पालमपुर, अहमदनगर, लखनऊ या शहरांमध्ये झालं आहे. पाकिस्तानातील दृश्याचं चित्रीकरण लखनऊतील ला मार्टिनीरी महाविद्यालयात झालं आहे. याच महाविद्यालयात सिनेमातील क्लायमॅक्सदेखील शूट करण्यात आले आहेत. तसेच मध्यप्रदेश आणि इंदौर आणि मांडूमध्येदेखील ‘गदर 2’चं शूटिंग झालं आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम