गडकरी व संघाचा होता अजित पवारांना विरोध ; पृथ्वीराज चव्हाण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ जुलै २०२३ ।  राज्यातील राजकारणात अजित पवारांच्या बंडखोरीतून अनेक मोठे मोठे गोप्यस्फोट नंतरच्या काळात अनेक राजकीय नेत्यांनी केले त्यात आता कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता गोप्यस्फोट केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी दैनिक लोकसत्ताला मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष सुरू होता. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडणार होती हे स्पष्टच होते. या संघर्षातूनच शरद पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता, असं सांगतानाच सुप्रिया सुळेंकडे पक्षाची जबाबदारी दिली तर अजित पवार सोडून जातील का याची चाचपणी शरद पवार यांनी केली. पण सुप्रिया सुळेंकडे जबाबदारी दिल्यानंतरही अजितदादा सोडून जात नसल्याची खात्री पटल्यावर शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला, असं धक्कादायक विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्षपद दिलं. पण दुसरीकडे अजित पवार यांनी अमित शाह यांच्याशी चर्चा सुरू केल्या होत्या. त्यांच्याशी अजितदादांच्या बैठका सुरू होत्या. प्रफुल्ल पटेल यात मध्यस्थी करत होते. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची अट ठेवली होती. त्यामुळे भाजपमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. अजित पवार यांना मुख्यमंत्री करायची की नाही हे भाजपमध्ये ठरत नव्हते. त्याचं कारण म्हणजे अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाला नितीन गडकरी यांच्या गटाचा आणि खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध होता, असं सांगतानाच अजितदादांना मुख्यमंत्री करायचे की नाही हा वाद अजूनही भाजपमध्ये सुरू आहे, असा दावाही चव्हाण यांनी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम