“या” खासदाराने वजन कमी केल्याने गडकरीनी दिले ३२ हजार कोटी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ ऑक्टोबर २०२२ ।  मध्य प्रदेशातील उज्जैन येथील भाजप खासदार अनिल फिरोजिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेले आव्हान गांभीर्याने घेत काही महिन्यातच तब्बल ३२ किलो वजन कमी केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी बक्षीस म्हणून गडकरींकडून ३२ हजार कोटी रुपये मिळवले आहेत

अनिल फिरोजिया यांचे वजन पूर्वी १३२ किलोच्या आसपास होते. फिरोजिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’ चळवळ सुरू केली आहे. यावेळी वजन कमी केल्यास उज्जैनच्या विकासकामांसाठी प्रति किलो १ हजार कोटी मिळतील. असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

त्याचवेळी दिलेल्या आश्वासनानुसार केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सुमारे २३०० कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी देत अनिल फिरोजिया यांना खास भेट दिली आहे. डकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल फिरोजिया यांना मी एक अट घातली आहे. माझं वजन त्यांच्यापेक्षा अधिक होतं. माझं वजन १३५ किलोग्रॅम होतं. आता माझं वजन ९३ किलो आहे. त्यामुळे अनिल फिरोजिया जितके किलो वजन कमी करतील तितके हजार कोटी रुपये त्यांच्या मतदारसंघासाठी देईन. अनिल फिरोजिया यांना वजन कमी करण्यासाठी मी १ किलोग्रॅममागे १ हजार कोटी रुपये देईन. असे गडकरी यांनी म्हटले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम