गडकरी हे मुंडेना ट्रॅपमध्ये अडकवत होते ; अंधारेंचा गौप्यस्फोट
दै. बातमीदार । ५ डिसेंबर २०२२ । राजकारणात गेल्या कित्येक वर्षापासून बीड आणि नागपूर यांच्या संघर्ष आहे हे नेहमी दिसूनही आले आहे. नितीन गडकरी जाणीवपूर्वक गोपीनाथ मुंडे यांना ट्रॅपमध्ये अडकवत होते, असा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एका जाहीर सभेत केला आहे. आता देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे यांना अडकवत असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांची यात्रा महाप्रबोधन यात्रा भंडारा जिल्ह्यात पोहोचली आहे. भंडारा जिल्ह्यातील सभेत सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
सुषमा अंधारे यांचा संभाजी भिडेंवर पलटवार
टिकली वरुन एका महिला पत्रकाराला बोलणारे संभाजी भिडे गुरुजी अमृता फडणवीस यांच्या मंगळसुत्रावरील वक्तव्यावर बोलतील का? असे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी करत भिडे गुरुजींवर पलटवार केला आहे. मुंबईच्या महिला पत्रकाराला मुलाखत घेताना टिकली नाही म्हणून मी बोलत नाही, असे वक्तव्य भिड़े गुरुजी यांनी केले होते. दरम्यान, अमृता फडणवीस यांना मंगळसूत्र घातले की, मला गळा आवळल्यांसारखे होते, त्यामुळे संस्कृती जपणारे भिडे गुरुजी अमृता फडणवीस यांना जाब विचारतील का? असा प्रश्न अंधारे यांनी विचारला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम