गांधी आधीच मोदीच पोहचले सुप्रीम कोर्टात !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ जुलै २०२३ ।  देशात गेल्या काही महिन्यापासून राहुल गांधी व पंतप्रधान नरेद्र मोदी असा सामना रंगला आहे. त्यात आता मोदी अडनावासंदर्भात गुजरात हायकोर्टाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची याचिका फेटाळण्यात आली आहे. यानंतर आता राहुल गांधी यांच्याकडून शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. मात्र यापूर्वीच मोदी आडनावाचा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला आहे.

राहुल गांधी यांची याचिका गुजरात हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आता भाजप आमदार पूर्णेश मोदीच पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले आहेत. राहुल गांधी यांच्याकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल होण्यापूर्वी मोदी यांच्याकडून कॅव्हेट दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आमची बाजूही ऐकून घेण्यात यावी अशी मागणी मोदी यांनी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम