गांधीनी एक दिवस सेक्यूलर जेलमध्ये रहावे ; मुख्यमंत्री शिंदे !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ मार्च २०२३ ।  राज्यातील आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता तर राहुल गांधी यांना निलंबित केल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेत देखील खडाजंगी झाली. सत्ताधारी नेत्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणा केल्या. त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला देखील चपला मारल्या. त्यामुळे विरोधकांनी आक्रमक होत आज सभागृहाचा त्याग केला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृता भाष्य केले.

शिंदे म्हणाले, आज देखील राहुल गांधी सावरकर यांचा अपमान केला आहे. या राहुल गांधी यांनी एक दिवस सेक्यूलर जेलमध्ये राहून यावे. त्यांना एक दिवस घाण्याला जुंपले तर तर त्यांना कळेल. वारंवार ते सावरकर यांचा अपमान करतात. त्यामुळे राग आणि चिड येण्याचे कारणे शोधायाल पाहिजे. राहुल गांधी यांचा आम्ही निषेध करतो. त्यांना निलंबित केले तो कायदा काँग्रेसनेच केला आहे. राहुल गांधी यांनी फक्त पंतप्रधानांचा अपमान केला नाही तर समस्थ ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी सभागृहातील सदस्यांना धन्यवाद दिले. एकनाथ शिंदे म्हणाले, उत्तर ऐकण्याआधी विरोधकांनी पळ काढला. आतापर्यंतच्या इतिहासातील चांगल काम आहे. गेल्या अडीच वर्षाच्या कामकाजाच्या तुलनेत विक्रमी काम होते. काही जणांना कामकाजात भाग न घेता फक्त पायऱ्यांवर काहीतरी स्टंट करायचा असतो. गेले अनेक दिवस त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीत. आम्ही संयम ठेवला होता. मात्र मर्यादा असते, ती संपल्यांनंतर सहन करता येत नाही. विरोधकांनी केलेल्या आंदोलनाला फक्त एक दिवस उत्तर दिले तर विरोधक म्हणतात. लोकशाहीचा अपमान झाला, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम