यूपीतील गुंडाचा स्पेशल टास्क फोर्सने केला एन्काऊंटर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ मे २०२३ ।  राज्यातील टॉप गुंडांपैकी एक गुंड असलेला अनिल दुजाना होता. त्याला उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने गुरुवारी कुख्यात गुंड अनिल दुजाना याचा मेरठमध्ये आणखी एका चकमकीत एन्काऊंटर केला. अनेक प्रकरणांमध्ये किंवा खून आणि खंडणीमध्ये त्याचा सहभाग होता. युपी पोलिसांनी गुंड-राजकारणी बनलेल्या अतिक अहमद यांचा मुलगा असद याला एका चकमकीत मारल्याच्या काही आठवड्यांनंतर ही घटना घडली आहे.

 

पश्चिम उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगार अनिल दुजाना याला २०२१ मध्ये दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडले होते. दुजानावर खून, खंडणी, दरोडा, जमीन बळकावणे आणि इतर 18 गुन्ह्यांसह 62 गुन्हे दाखल आहेत. बुलंदशहर पोलिसांनी अनिल दुजानावर २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले होते तर नोएडा पोलिसांनी त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. तो २०१२ पासून तुरुंगात होता, पण २०२१ मध्ये त्याला जामीन मिळाला. त्यानंतर जुन्या खटल्यांमध्ये हजर न राहिल्याने न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम