श्यामची आई ही भूमिका करतांना घरच्या संस्कारांचे महत्व समजले – गौरी देशपांडे

बातमी शेअर करा...

जळगाव ;- –घरच्या संस्कारांचे काय महत्त्व असते हे मला श्यामची आई ही भूमिका करतांना समजत गेले असे प्रतिपादन श्यामची आई या मराठी चित्रपटातील श्यामच्या आईची भूमिका साकार करणाऱ्या सिनेअभिनेत्री गौरी देशपांडे यांनी व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विचारधारा प्रशाळे अंतर्गत कार्यरत असलेल्या पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्र आणि रासायनिक तंत्रज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गौरी देशपांडे यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.म. सु. पगारे होते. यावेळी मंचावर विभाग प्रमुख डॉ. मनोज पाटील, प्रा.उज्वल पाटील,साने गुरुजी स्मारक समितीच्या दर्शना पवार यांची उपस्थिती होती. दर्शना पवार यांनी गौरी देशपांडे यांना बोलते केले. करिअर करताना संधी आणि आपली आवड यांचा मध्य पाहता आला पाहिजे. मी स्पीच थेरेपिस्ट म्हणून पदवी घेतली असली तरी करिअर म्हणून अभिनयक्षेत्र निवडले त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपली आवड जोपासावी असे त्या म्हणाल्या.

श्यामची आई या भूमिकेसाठी श्याम सुजय डहाके यांनी ऑडिशन घेतली. ही ऑडिशन खूप वेळ चालली.माझी निवड झाल्यानंतर मी खूप आनंदी होते. या पात्रासाठी खूप सराव करून घेतला. अगदी आमच्या पुण्यातल्या घरी मी आणि श्यामचे पात्र साकारणारा शर्व यांनी खूप सराव केला असं सांगून गौरी देशपांडे म्हणाल्या की, श्यामची आई हे पुस्तक मुलांसोबत पालकांसाठी देखील महत्त्वाचे आहे आजच्या काळात मूल आणि पालक यांच्यातील संवाद संपत चालला आहे किंबहुना त्यासाठी काही पालक समुपदेशन सुद्धा करत असतात. त्यामुळे आजच्या काळातही या पुस्तकाचे महत्त्व खूप आहे. प्रा.म.सु. पगारे यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रास्ताविक साने गुरुजी संस्कार केंद्राचे विभाग प्रमुख डॉ.मनोज पाटील यांनी केले.सू त्रसंचालन गौरव हरताळे यांनी केले तर प्रा.बाळासाहेब सूर्यवंशी यांनी आभार मानले.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम