दै. बातमीदार । २६ मे २०२३ । राज्यात गेल्या काही महिन्यापासून नेहमीच वादात सापडलेल्या गौतमी पाटील ला पुन्हा एका नव्या वादाला सामोरे जावे लागले आहे. दुकानाचं उद्घाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. यामुळे सध्या गौतमी आणि कार्यक्रमात राडा हे जणू समीकरणच बनत चाललं आहे. यामुळे अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. यातच आता गौतमीच्या आडनावावरून वाद निर्माण झाला आहे.
गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून तिने तिचे खरे आडनाव लपून ठेवल्याचा आरोप मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे. यावर काल विरारमध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या गौतमीने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तिने आडनावावरून वाद झालेल्या विषयावर भाष्य केले. ती म्हणाली की, “मी पाटील आहे तर पाटील आडनावच वापरनार ना. मी या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. मला कोणी काहीही बोलले तरी मला काही फरक पडत नाही,” असे स्पष्ट गौतमीने सांगितले.
“मी कसलीही बदनामी करत नाही.
माझा कार्यक्रम सांस्कृतिक आहे. तो मी पार पाडत असते. चांगला कार्यक्रम होत असतो. कोण मला नावे ठेवतो मला फरक पडत नाही. कुणाला माझ्या कार्यक्रमावर आक्षेप असेल, प्रश्न असेल तर त्यांनी माझा कार्यक्रम पूर्ण पाहावा त्यानंतर बोलावे”, असं थेट आव्हानच गौतमीने दिले आहे. यावेळी गौतमीला राजकारणात येणार का? असा सवालही करण्यात आला. यावर तिने राजकारणात येणार नसल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला. ‘गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून तिने तिचे खरे आडनाव लपवले असल्याचा आरोप मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे. “गौतमीचे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव वापरून तिने पाटलांची बदनामी केली. गौतमीने पाटील हे आडनाव वापरु नये, अन्यथा तिचे कार्यक्रम राज्यात चालू देणार नाही,” असा इशारा राजेंद्र पाटील यांनी दिला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम