गौतमीने घेतली छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट अन म्हणाली…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ मे २०२३ ।  सध्या राज्यात धुमाकूळ घालणारी गौतमी पाटील हिची कधी चर्चा होणार नाही असे शक्य नाही. ती पुन्हा एका नव्या चर्चेत असमोर आली आहे. गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असते. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाल्याचे देखील पाहायला मिळाले.

नुकतीच गौतमीन साताऱ्यात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी गौतमीने राजेंना खास भेट दिल्याचे देखील समजते. या भेटीबाबत आता स्वतः उदयनराजेंनी स्पष्टीकरण दिल आहे. साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजेंनी गौतमी पाटीलसोबत झालेल्या भेटीबाबत भाष्य केले. यावेळी एका पत्रकाराने गौतमी नेमकी का भेटायला आली होती ? असा सवाल विचारला.असता उदयनराजेंनी “तुमच्या चेहऱ्यावर स्माईल का आहे?” असं प्रतिसवाल करत पत्रकाराला चिमटा काढला. यानंतर एकच हशा पिकला.

याबाबत सांगताना उदयनराजे पुढे म्हणाले,”गौतमी पाटील या एक कलाकार आहेत. जो कलेची दाद देतो, त्यांच्याकडेच त्या जाणार ना. कलेची जाण नसणाऱ्या व्यक्तीकडे त्या का जातील? तसेच आगामी चित्रपट आणि इतर प्रकल्पासाठी माझ्याकडून त्यांना काहीतरी सहकार्य मिळेल, म्हणून त्या आल्या असतील. यासाठी त्यांना शुभेच्छा देणं आपलं कामच आहे असं स्पष्टीकरण यावेळी उदयनराजेंनी दिलं.

“छत्रपती उदयनराजे यांची भेट घेतल्यानंतर खूप छान वाटलं. महाराजांची भेट होईल असं मला वाटले नव्हते. महाराजांचा स्वभाव खूप छान आहे. त्यांना कलाकारांची खूप जाण आहे, म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. छत्रपती उदयनराजे भोसले हे आमचं दैवत आहेत. त्यामुळं मी त्यांच्यापेक्षा मोठी नाही.” यासोबतच महाराजांना परफ्युम गिफ्ट दिल्याचे देखील गौतमीने यावेळी सांगितले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम