बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलने केली धमाल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ मार्च २०२३ । खान्देशातील छोट्या गावात जन्म घेणारी एक मुलगी आपल्या आईसोबत पुण्यात जाते. तिथे लहानाची मोठी होते. डान्स क्लासला जाते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी पुढे ऑर्केस्ट्रा आणि इतर माध्यमातून काम सुरु करते. हळूहळू सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीस येते. त्यानंतर प्रचंड लोकप्रियदेखील होते. चक्क एका बैलाच्या वाढदिवशी ठेवण्यात आला आहे. सातारकरांच्या या खुळ्या नादाची एकच चर्चा आहे. नृत्यांगना गौतमी पाटीलचे नृत्य ठेवण्यासाठी राज्यभरातून चढाओढ लागते. तिचा कार्यक्रम म्हटले की, टाळ्या आणि शिट्ट्यांची नुसती बरसात होते. हेच पाहता हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिच्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे. अनेक कार्यक्रमासाठी गौतमीला लावणी सादर करण्यासाठी बोलवतात. तिचे मानधनही गब्बर असते. जावळी तालुक्यातल्या खर्शीचे (जि. सातारा) बैलगाडा मालक पैलवान सतीश भोसले. ते दरवर्षी आपल्या अश्विन या बैलाचा वाढदिवस झोकात साजरा करतात. बरे त्यांच्या अश्विनने महाराष्ट्र चॅम्पियन गाजवलेली. त्याचा आज तिसरा वाढदिवस. दरवर्षी ते अश्विनच्या वाढदिवशी सांस्कृतिक कार्यक्रम घेतातच. मात्र, या वर्षी त्यांनी चक्क गौतमी पाटीलच्या लावणीचा बार उडवण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार आज सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम ठेवण्यात आला. लावणी पाहण्यासाठी मोठी पब्लिक जमायची शक्यता गृहीत धरून शेतात स्टेज उभारले गेले आहे.

साताऱ्यात पाच वर्षांच्या आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी थेट गौतमी पाटीलचा शो आयोजित केला होता. सातार्‍यातील खोजेवाडी गावातील 5 वर्षाच्या मल्हार शिंदे या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी ‘होऊ दे खर्च’ म्हणत चक्क गौतमी पाटीलच्या लावण्यांचा कार्यक्रम ठेवल्याने जिल्ह्यात या वाढदिवसाची जोरदार चर्चा होती. त्यानंतर आता चक्क बैलाच्या वाढदिवशी हा कार्यक्रम होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम