गौतमीने सांगतिले लवकर लग्न करणार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ मे २०२३ ।  राज्यात आपल्या डान्सचे अनेक तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील हिची चर्चा होणार नाही असे होत नाही. ती नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत येत असते. तिचं सबसे कातील गौतमी पाटील हे वाक्य तुम्ही हमखास ऐकलं असणार. हे नाव आता गल्लीबोळात पसरल आहे. ती नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतचं तिच्या कार्यक्रमात पत्र्याच शेड कोसळून अनेक तरुण जखमी झाले होते.

गौतमीच्या नृत्यांचे अनेक व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. तिचे कार्यक्रमही खुप गाजतात.मात्र ती जितकी वादात असते ती तितकिच तिची क्रेझही आहे. तरुणाईला तिनं डान्स अन् हावभावने भुरळ पाडली आहे. तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी असते. तिची झलक पाहण्यासाठी लोक आतुर असतात असं काहीस चित्र सध्या दिसत आहे. गौतमी ही अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आली.आता पुन्हा गौतमी चर्चेत आली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणुन घेण्यास चाहते उत्सूक असतात. त्यातच काही दिवसांपुर्वीच तिनं तिच्या जोडीदाराबद्दल सांगतिलं होतं. गौतमीला कोणत्याही मुलाखतीत किंवा कार्यक्रमात तू लग्न कधी करणार हा प्रश्न हमखास विचारला जातो. आता याच प्रश्नाचं उत्तर गौतमीनं एका मुलाखतीत दिली. एका वृत्तवाहिनीला गौतमीने मुलाखत दिली. यामुलाखतीत तिने बऱ्याच मुद्यावर भाष्य केलं. त्यातच तिनं ती लग्न कधी करणार याबद्दलही सांगितलं.

जेव्हा तिला लग्नाबाबत विचरलं त्यावेळी गौतमी लाजली. तिचा चेहरा लाल पडला होता. लाजत तिने या प्रश्नाचं उत्तर दिलं. ती म्हणाली की, मी सध्या लग्नाचा विचार करत नाही. पण लवकरच मी लग्न करणार आहे. मी तुम्हाला सर्वांना लग्नाचं आमंत्रण देईन. जसं माझ्या कार्यक्रमात गोंधळ घालतात तसचं तुम्ही लग्नाला या आणि तिथेही गोंधळ घालून जा अशी कोपरखळी देखील गौतमीनं काढली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम