बायकोच्या वाढदिवसाला गौतमीचा डान्स !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० मार्च २०२३ । राज्याला आपल्या नृत्याची क्रेझ लावणारी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या आज राज्यभर कार्यक्रम करताना दिसत आहे व काही ठिकाणी तिच्या कार्यक्रमात जर राडा झाला नाही असे होत नाही. सोशल मीडियावर तर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमाला गर्दी ही होतीच.

कधीकधी तर तिच्या कार्यक्रमात हाणामारी झाल्याची घटना देखील घडली आहे. आता गावोगावी जत्रा- यात्राचा सीझन सुरू आहे. मग काय सगळीकडे गौतमीच्या कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात येत आहे. शिवाय याही पुढं जाऊन लोकं आता गौतमीला घरगुती कार्यक्रमाचं देखील आमंत्रण देत आहेत. एका पठ्ठ्याने तर बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने चक्क गौतमी पाटीलचा डान्स ठेवला. गौतमीच्या हाताने केकही कापला. मग काय गावात चर्चा होणार आणि विषय रंगणार.. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करताना दिसते.

त्यात बायकोचा वाढदिवस म्हटल्यांवर विषयच वेगळा असतो. एका पठ्ठ्याने तर बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने चक्क गौतमी पाटीलचा डान्स शो ठेवला. आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा येथील किरण गावडे यांची पत्नी प्रगती गावडे यांचा वाढदिवस सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त चक्क नृत्यांगना गौतमी पाटील हिचा डान्स शो ठेवण्यात आला होता. गौतमी पाटील हिच्या हस्ते केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. या अनोख्या वाढदिवसाला भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी तरुणाईंनी देखील मोठी गर्दी केली होती.

अशा पद्धतीनं बायकोचा वाढदिवस साजरा केल्याने गावात सगळीकडं या वाढदिवसाची चर्चा रंगली आहे. या वाढदिवसाला गौतमी पाटील मराठमोळ्या पद्धतीने वेश परिधान करून आली होती. तर वाढदिवसासाठी मोठा केक आणण्यात आला होता. प्रगती यांनी केक कापल्यानंतर हा केक गौतमीला भरवला. त्यानंतर गौतमीनेही प्रगती यांना केक भरवत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गौतमी पाटील यांचा डान्स पाहण्यासाठी जिल्ह्यातील अनेक ठिकाणांहून तरुणांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. गौतमी पाटीलचा डान्स सुरू झाल्यानंतर तरुणांनी शिट्ट्या वाजवत आणि ‘सबसे कातिल गौतमी पाटील’च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. याशिवाय काही तरुणांनी मंडपातच भन्नाट डान्स करायला सुरुवात केली. त्यामुळं अनेकांनी या मजेशीर कार्यक्रमाचा आनंद लुटला. गौतमीचा लवकरच ‘घुंगरू’ नावाचा चित्रपट येतो आहे. या चित्रपटाचे शूटिंग थायलंडमध्ये पार पडले. याशिवाय सोलापूर, माढा, हंपी या ठिकाणीही चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटाची निर्मिती बाबा गायकवाड यांनी केली आहे. तेच या चित्रपटात गौतमीसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचे म्हटले जाते आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम