मुख्यमंत्र्यांपेक्षा गौतमीच्या कार्यक्रमाला जास्त गर्दी ; आमदाराचे वक्तव्य !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ जून २०२३ ।  सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत असलेली गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला कोणत्याही ठिकाणी तुफान गर्दी उसळत असल्याचे व्हिडीओ सातत्याने सोशल मिडीयावर दिसत आहे. असे असतांना याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी नसते जेवढी गर्दी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला असते, असं विधान दिलीप मोहिते-पाटील यांनी केलं आहे.

एका कार्यक्रमामध्ये बोलताना दिलीप मोहिते-पाटील म्हणाले, “गौतमी अत्यंत गरीब परिस्थितीतून आली आहे. ती तिच्या कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस अधिकारी तिच्या कार्यक्रमावर बंदी घालतात. मात्र, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी जमत नाही जेवढी तिच्या कार्यक्रमांना जमते.” पुढे बोलताना ते म्हणाले, “गौतमी ट्रोल होत आहे, हे मला माहित आहे. ती एक कलाकार आहे. ती एक नवीन कलाकार आहे. तिची कला थांबवू नका आणि त्याचबरोबर इतक्या लवकर तिचं आयुष्य संपवू नका, अशी माझी समाजाला विनंती आहे.

दरम्यान, गौतमी पाटील अल्पकालावधीतच आपल्या नृत्याने प्रसिद्ध झाली आहे. तिच्या नृत्यावर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आला होता. तिच्या नृत्यावर मराठी सिने क्षेत्र ते लावणी कलाकारापर्यंत सर्वांनी प्रतिक्रिया देत तिचा विरोध केला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम