
काळ्या ओठापासून मिळवा अशी मुक्ती !
बातमीदार | १६ ऑगस्ट २०२३ | प्रत्येक महिला सुंदर दिसण्यासाठी नेहमीच वेगवेगळे उपाय करीत असतात. यामध्ये अनेक प्रकारचे क्रीम, घरगुती उपाय करून पाहतात. डोळे, नाक, कान आणि गालांप्रमाणेच ओठही खूप महत्त्वाचे असतात. त्यांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागते. तुमच्या लक्षात आलं असेल तर काही लोकांचे ओठ काळे दिसतात. मात्र, यामागे काही कारणे असू शकतात. काळ्या ओठांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते. अशावेळी ओठ मऊ आणि गुलाबी करण्यासाठी तुम्ही बाजारातील काही क्रीम वापरू शकता. पण आज आम्ही तुम्हाला काही घरगुती आणि देसी रेसिपी सांगणार आहोत ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या ओठांना नॅचरल पिंक लुक देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया ओठ गुलाबी करण्याची घरगुती उपाय…
काकडी
ओठांवर काळी वर्तुळे किंवा काळे डाग असतील तर घरगुती उपायांमध्ये काकडीचा वापर करू शकता. खरं तर काकडी त्वचेला हायड्रेट करते. ताज्या काकडीचे तुकडे अर्धा तास ओठांवर ठेवा. यामुळे तुमचे ओठ काही दिवसांतच नॅचरल लुकमध्ये येऊ लागतील. काकडीत अँटीऑक्सिडंट्स आणि सिलिका युक्त संयुगे असतात, ज्यामुळे ओठांचा काळेपणा दूर होतो.
बीटरूट
ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी बीटरूट खूप प्रभावी आहे. याचा वापर केल्याने तुमचे काळे ओठ काही दिवसांतच गुलाबाच्या पाकळ्यांसारखे मुलायम होतील. आपल्या ओठांना नैसर्गिक लुक देण्यासाठी, बीटरूट सोलून किसून घ्या. नंतर ते ओठांवर लावा. साधारण 15 ते 20 मिनिटांनी ओठ पाण्याने धुवून घ्यावेत.
कोरफड जेल
कोरफड जेल त्वचेसाठी वरदान मानले जाते. कोरफडीच्या वापरामुळे त्वचेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येमध्ये बरेच फायदे मिळतात. त्याचप्रमाणे ओठ गुलाबी होण्यासाठीही उपयुक्त ठरते. गुलाबी ओठांसाठी ही एक उत्तम घरगुती रेसिपी आहे. कोरफड ओठांचा काळापणा खूप लवकर दूर करते. कोरफड जेल घेऊन ओठांवर चांगला मसाज करा. रात्री झोपण्यापूर्वीही तुम्ही हे लावू शकता. सकाळी उठून पाण्याने चेहरा धुवावा.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम