यंदाच्या भाऊबिजेला द्या या वस्तू बहिणीला भेट;होईल खुश

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ ऑक्टोबर २०२२ । यंदाची दिवाळी मोठ्या धूमधडाक्यात साजरी होत आहे, तर भाऊबीज सणाला हि लहान बहिण मोठ्या भावाला हक्काने भेट वस्तू मागत आहे तुम्हाला नक्की विचार पडला असेल कि आज बहिणीला काय भेट देणार आम्ही तुम्हाला काही सुचवू शकतो ज्याने बहिण अगदी खुश होवून जाईल.

सौंदर्य प्रसाधने – सौंदर्य प्रसाधने महिलांना अत्यंत प्रिय असतात. त्वचेला उजळ करण्यासाठी किंवा अन्य उत्सव किंवा कार्यक्रमाप्रसंगी महिला आवर्जून मेकअप करतात. तुम्ही त्यांना मेकअप किट गिफ्ट करून आणखी त्यांच्या सौंदर्यप्रसाधनांत आणि आनंदातही भर पाडाल.

हॅंडबॅग– तुमची बहिण जॉब करत असेल किंवा शिकत असेल तर तिच्यासाठी ही भेटवस्तू उत्तम ठरेल. या हँडबॅगमध्ये ती तिच्या उपयोगात येणाऱ्या लहानसहान वस्तू ठेवू शकेल.

स्मार्टवॉच – अलीकडे सगळीकडे स्मार्टवॉचचा प्रचंड ट्रेंड दिसून येतो. एखाद्याच्या हातात दिसल्यास ती आपल्यालाही हवी हवीशी वाटते. तुम्हाच्या बहिणीकडे स्मार्टवॉच नसेल तर तुम्ही तिला स्मार्टवॉचही गिफ्ट करू शकता.

ज्वेलरी – महिलांना ज्वेलरीचं देखील प्रचंड वेड असतं. जर तुमच्या बहिणीला अमुक प्रकारचा सेट आवडतो हे तुम्हाला ठाऊक असेल तर तुम्ही तो देखील तिला गिफ्ट करू शकता.
पादत्राणे (सँडल्स) – अनेकींना वेगवेगळ्या चपलांचं वेड असतं. तुमच्याही बहिणीला असेल तर चांगल्या कंपनीची एखादी टिकाऊ आणि फँसी सँडल तुम्ही गिफ्ट करू शकता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम