
वरणगावात वीर जवानाला मानवंदना देताना मंत्री गिरीश महाजन जखमी
उपचारानंतर नाशिकला रवाना*
वरणगावात वीर जवानाला मानवंदना देताना मंत्री गिरीश महाजन जखमी
उपचारानंतर नाशिकला रवाना
वरणगाव,;– वीर जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी वरणगावात आलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना गुरुवारी, २७ मार्च रोजी एका अपघातात दुखापत झाली. पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिलिट्री ट्रकमध्ये चढताना त्यांच्या डोक्याला वाहनाचा रॉड लागला, ज्यामुळे रक्तस्त्राव सुरू झाला आणि ते जखमी झाले.
या जखमेनंतरही चक्कर येत असतानाही मंत्री महाजन यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. मात्र, रक्तस्त्राव थांबत नसल्याने माजी नगराध्यक्ष सुनील काळे आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. उपचारानंतर महाजन यांनी बाविस्कर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले आणि राज्य सरकार तसेच स्वतःच्या वतीने कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ते नाशिक येथील नियोजित बैठकीसाठी वाहनाने रवाना झाले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम