फॉक्सकॉन-वेदांता वादात गिरीश महाजनांची उडी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ सप्टेंबर २०२२ फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्पावरून आरोप-प्रत्यारोपांची खडाजंगी सुरू असतांना या वादात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उडी घेत पूर्वीच्या सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तत्कालीन विद्यमान सरकारच्या निष्क्रियतेवर बोट ठेवल्याने शिंदे सरकारने पाठपुरावा करीत हा प्रकल्प आधीच गुजरातमध्ये गेल्याचा दावा केला असून, फॉक्सकॉन-वेदांता हे दोहोबाजूंच्या नेत्यांचे एकमेकांशी भिडण्याचे कारण बनले आहे.

मविआ सरकारला वाईनबाबत बैठका घेण्यासाठी, दारूच्या किंमती कमी करण्यासाठी वेळ होता. मात्र फॉक्सकॉन-वेदांताबाबत बैठक घेण्यासाठी वेळ नसल्याने हा प्रकल्प राज्याच्या हातून निसटून गुजरातकडे गेला आहे. आता त्यांचे अपयश व नाकर्तेपणा लपविण्यासाठी ते राज्यसरकारवर टीका करत असल्याचा आरोपही गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला आहे.

दरम्यान, स्वकर्तृत्वावर आधीच्या सरकारचे दोनदेखील खासदार येऊ शकले नसते. मात्र मोदींमुळे अठरा आमदार-खासदार निवडून आले असूनही टीका करत राहण्यापेक्षा आधी त्यांनी राजीनामा देऊन निवडून दाखवण्याचे आव्हानही महाजन यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम