कुठल्याही कोर्टात जा” उद्धव ठाकरेंना सुनावले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ मे २०२३ ।  राज्यातील सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाविरोधात भाजप व शिंदे गटामध्ये तुफान वाक्य युद्ध सुरु असतांना आता केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नारायण राणे हे सातारा दौऱ्यावर असून त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा देवून मुर्खपणा केला. हे त्यांनी स्वत: कबूल केलं आहे यामुळे त्यांनी आम्हाला सांगू नये की तुम्ही राजीनामा द्या तो तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाही. तसचं आधी विधानसभा अध्यक्षांना कालमर्यादा असते का? याचा अभ्यास करा मग बोला. उद्धव ठाकरे नावाला मुख्यमंत्री होते. ते फक्त दोन तास मंत्रालयात जायचे. त्यांनी कधी मातोश्री हे घर सोडलं नाही. त्यांना कायदा माहिती नाही. अध्यक्षाला टाईम लिमीट आहे का? मग काशाला बोलता की सुप्रीम कोर्टात जाणार? कुठल्याही कोर्टात जा”, अशी सडकून टीका नारायण राणे यांनी केली.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी म्हटलं होत की, मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला आहे. त्यावर आता नारायण राणेंनी हल्लबोल करत म्हटलं की, “उद्धव ठाकरेंनी 2019च्या निवडणुकीवेळी सुरुवातीला भाजपचं मंगळसूत्र गळ्यात घातलं परंतु निवडून आल्यानंतर शरद पवार यांचा हात धरून निघून गेले. त्यावेळी त्यांची ही नैतिकता कुठे गेली होती? ज्या माणसाला नैतिकता माहीत नाही त्यांनी त्यावर बोलू नये. घरातच बसा”.अशा शब्दात नारायण राणे यांनी हल्लाबोल केला. नारायण राणे यांच्या या टिकेनंतर ठाकरे गटाची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं रंजक ठरेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम