पुन्हा तुरुंगात जाल ; शंभूराज देसाई यांचा राऊतांवर टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ डिसेंबर २०२२ । संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री शिंदेंना षंढ हा शब्द वापरल्याने शिंदे गटाचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहे तर दुसरीकडे पत्रकार परिषद घेत शंभूराज देसाईंनी चक्क राऊत यांना इशाराच दिला आहे ते म्हणाले कि, संजय राऊत नुकतेच साडेतीन महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यांना बाहेरचे वातावरण सुट होत नाही, असे दिसत आहे. ते जर असेच वक्तव्य करत राहिले तर लवकरच त्यांच्यावर पुन्हा आराम करण्याची वेळ येईल.

आज पत्रकार परिषद घेत शंभूराज देसाईंनी सीमावादावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिले. देसाई म्हणाले, सीमावादाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार केंद्रापुढे महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडली आहे. याप्रकरणी केंद्राने महाराष्ट्र सरकार व कर्नाटक सरकार या दोघांनी एकत्र आणून त्यांच्यात चर्चा घडवून समेटाने वाद मिटवावा, अशी मागणी शिंदेंनी केली आहे. सीमावाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे प्रयत्न करत असतानाही संजय राऊत त्यांना षंढ शब्द वापरत असतील तर तो आम्ही सहन करणार नाही. शंभूराज देसाई म्हणाले, संजय राऊत यांना न्यायालयीन संरक्षणात बेळगावमध्ये बोलावले होते. न्यायालयाच कवचकुंडल असतानाही ते बेळगावला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे संजय राऊत मोठे षंढ आहेत, असे म्हटले तर त्यांना चालेल का? त्यामुळे आमची संजय राऊतांना विनंती आहे की, त्यांनी आपले तोंड आवरावे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम