ट्रीपला जाताय ; अशी घ्या काळजी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० डिसेंबर २०२२ । बरेच लोक हिवाळ्यात बाहेर फिरण्यासाठी जात असतात, बाहेरगावी गेल्याने नियमित पाणी एकाच ठिकानी मिळेल असे नाही वेगवेगळ्या ठिकाणी पाणी हे वेगवेगळे असते तसेच आपल्या आरोग्य यामुळेही अस्वस्थ होत असते. तर प्रवासादरम्यान त्वचा सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषण इत्यादींच्या संपर्कात येते. यामुळे त्वचा टॅन होणे, डाग आणि मुरुमे येणे अशा त्वचेसंदर्भातील समस्या उद्भवणे हे सामान्य आहे. प्रवासात आपण फिरण्यात, नवी ठिकाणे शोधण्यात, सुंदर वस्तू खरेदी करण्यात आणि वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढण्यात इतके बिझी असतो की आपण आपल्या त्वचेची नीट काळजी घेत नाही. त्यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. त्यामुळे प्रवासात असतानाही त्वचेकडे दुर्लक्ष न करता नीट काळजी घेणे महत्त्वाचे आहे. प्रवासातही स्किनकेअर रूटीनचे पालन करावे.

त्वचा स्वच्छ करावी

फेस क्लिन्जरचा वापर करून तुम्ही त्वचेवर साचलेली घाण काढून टाकू शकता. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि ताजी राहते. चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा चेहरा धुवावा. प्रवासाला जाताना तुमच्या किटमध्ये फेस क्लिन्जर ठेवा.

मॉयश्चरायझर वापरावे

जर तुम्ही हिवाळ्यात प्रवास करत असाल तर तुमच्या किटमध्ये मॉयश्चरायझर ठेवायला विसरू नका. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये त्वचा कोरडी होतो. अशा वेळी मॉयश्चरायझरचा वापर केल्यास त्वचा कोरडेपणापासून वाचते. तसेच त्वचा हायड्रेटेड आणि मऊ राहण्यास मदत होते.

टोनर वापरा

तुम्ही त्वचेसाठी टोनर वापरू शकता. टोनरमुळे कोरडेपणा आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. तसेच टोनर हे त्वचेची पीएच पातळी राखण्यास मदत करते. टोनरमुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते.

सनस्क्रीन आठवणीने वापरा

बाहेर फिरताना त्वचेचे हानिकारक यूव्ही (अतिनील) किरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर आवश्यक ठरतो. प्रवासात आपण बहुतांश वेळ बाहेर घालवतो. सूर्यप्रकाशामुळे त्वचा काळवंडते आणि निस्तेज व निर्जीव दिसू लागते. अशा वेळी थोड्या-थोड्या वेळाने सनस्क्रीन लावायला विसरू नका. त्यामुळे तुमच्या त्वचेचे संरक्षण होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम