भाऊबीजच्या दुसऱ्यादिवशी सोने चांदीचे भावात वाढ; जाणून घ्या आजचे दर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ ऑक्टोबर २०२२ ।दिवाळीमधील लक्ष्मी पूजन झाल्यानंतर सोने चांदीचे भाव स्थिर असतांना भाऊबीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच सोने चांदीचे भावात वाढ पाहायला मिळत आहे. आज सोने आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,000 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,280 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 581 रुपये आहे. देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई – 51,980 रुपये

दिल्ली – 51,430 रुपये

हैदराबाद – 51,280 रुपये

कोलकत्ता – 51,280 रुपये

लखनऊ – 51,280 रुपये

मुंबई – 51,110 रुपये

नागपूर – 51,310 रुपये

पुणे – 51,310 रुपये

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम