नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ
दै. बातमीदार । ४ जानेवारी २०२३ नवीन वर्षात काही प्रमाणात स्वस्त झालेले सोने पुन्हा आज मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसत आहे. जागतिक स्तरावर सोन्या-चांदीच्या किंमतीतील चढ-उतार कायम आहेत. भारतीय बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्याचा परिणाम महारष्ट्रातमध्ये दिसून आला आहे.
आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 50,960 तर 24 कॅरेट साठी 55,590 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 720 रुपये आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
चेन्नई – 56,670 रुपये
दिल्ली – 55,740 रुपये
हैदराबाद – 55,590 रुपये
कोलकत्ता – 55,590 रुपये
लखनऊ – 55,740 रुपये
मुंबई – 55,590 रुपये
नागपूर – 55,590 रुपये
पुणे – 55,590 रुपये
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.
24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम