राज्यात सापडला सोन्याचा खजिना ; मुख्यमंत्री शिंदेंनी केला पत्रकार परिषदेत उल्लेख !
दै. बातमीदार । ५ डिसेंबर २०२२ । गेल्या आठवड्यात राज्यातील दोन जिल्ह्यात सोन्याचा खाणी सापडल्याची माहिती समोर आली होती. नागपूर जिल्ह्यातही मुबलक प्रमाणात साेन्याचे साठे असल्याचा अंदाज भूगर्भ सर्वेक्षण विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम ब्लाॅकमध्ये परसाेडीच्या परिसरात साेन्याचे मुबलक साठे असल्याचे जीएसआयने नमूद केले आहे.
जीएसआयने प्रकाशीत केलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात परसोडीसह किटाळी, मरुपार आणि भंडारा जिल्ह्यात भीमसेन किल्ला पहार येथे सोन्याचा खजिना असल्याची माहिती समोर आली आहे.
जीएसआयने परसोडी भागात तपशीलवार सर्वेक्षण करून चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात मौल्यवान धातूचे साठे असल्याची शक्यता वर्तविली आहे. भिवापूर परिसरातही सोन्याचे साठे असण्याची शक्यता आहे असे म्हटले आहे. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे जीएसआयने सांगितले आहे. खोदकाम करण्याचा सल्ला जीएसआयने राज्य सरकारकडे अहवालाद्वारे दिला होता. मात्र, कालपरत्वे या अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आले. यापूर्वी, चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागात भूर्गभात सोन्याचे दोन ब्लॉक (खाणी) आढळून आल्या आहेत. राज्यात सोन्याच्या खाणी असल्याचा ओझरता उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ताज हॉटेलमधील खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेत केला होता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम