नाशकातील गोल्डमॅनवर कोट्यावधीचा घोटाळ्याचा आरोप !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ फेब्रुवारी २०२३ । राज्यात गेल्या पाच वर्षापासून अनेक लोकांनी आपल्या अंगावर सोन्याचे दागिने घालीत रेकॉर्ड बनविले आहे, पण त्यातील काही लोकावर गेल्या दोन वर्षापासून विविध गुन्हे दाखल झाले तर नाशिक जिल्ह्यातील एका गोल्डमॅनवर तर आता घोटाळ्याचा आरोप झाला आहे.

येवला येथील गोल्डमॅन पंकज पारख यांनी ४ किलो पेक्षा जास्त वजनाचा सोन्याचा शर्ट बनवून पुण्यातील फुगे यांचे रेकॉर्ड ब्रेकच केले नव्हते तर गिनीज बुकातही स्वतःच्या नावाची नोंद केली. त्यामुळे, तब्बल सव्वा कोटींचा शर्ट परिधान करणारा हा गोल्डमॅन चांगलाच चर्चेत होता. आता, पंकज पारख यांना एका घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. पंकज पारिख संचालक असलेल्या पतसंस्थेमध्ये 22 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांनी पंकज पारख यांना अटक केली आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका फ्लॅटमधून पारख यांना अटक केली. पंकज पारख, चेअरमन योगेश सोनी, व्यवस्थापक अजय जैन आणि संचालक मंडळाच्या विरोधात सहायक निबंधक प्रताप पाडवी यांनी तक्रार दिली होती. येवला येथील कै.सुभाषचंद्र पारख पतसंस्थेच्या 17 संचालक मंडळावर 21 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप बँकेचे प्रशासक व सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांनी केला आहे. दरम्यान, पुढील तपासासाठी पारख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी घेऊन गेले असून शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नाशिकच्या येवला भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष व उपमहापौर असलेले पारिख व्यावसायिक आहेत. त्यांनी १० किलो वजनाचा सोन्याचा शर्ट बनवून घेतला आहे व जगातील सर्वाधिक महागडा शर्ट अशी नोंद गिनीज बुकमध्ये केली आहे. पारिख हा शर्ट घालतात तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी सहा बॉडीगार्ड असतात. या शर्टचे डिझाईन त्यांनी दुबईतून बनवून घेतले व नाशिकच्या बाफना सराफांनी तो बनविला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम